युजीसीचे सचिव पद मिळणे हा विद्यापीठाच्या सर्व घटकांचा सन्मान- डॉ. मनिष जोशी

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शिक्षणक्षेत्रातील अग्रणी संस्था विद्यापीठ अनुदान आयोग, युजीसीचे सचिव पद मिळणे हा केवळ माझाच नव्हे तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व घटकांचा सन्मान आहे असे प्रतिपादन युजीसीचे नवनियुक्त सचिव प्रा. मनिष जोशी यांनी सत्कार प्रसंगी केले.

कबचौउमविचे संगणकशास्त्र प्रशाळेतील प्रा. मनिष जोशी यांची नुकतीच युजीसी, दिल्लीच्या सचिव पदी नियुक्ती झाली आहे त्यानिमित्ताने विद्यापीठातील सर्व स्टेनोग्राफर्स तर्फे त्यांचा हृदय सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. इतक्या मोठया संस्थेत सचिव पदावर पोहचणे आयुष्यातील मोठी संधी आहे. मात्र इथपर्यंत पोहचण्यासाठी कबचौउमविच्या सर्वच घटकांचे योगदान महत्वाचे आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून श्रमसंस्कृतीत रुजलेल्या आमच्यासारख्या शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठात अध्यापनाच्या कार्याबरोबर विविध शैक्षणिक कार्यक्रम, उपक्रम यशस्वीप्रणे राबविले त्यामुळे ही निवड करण्यात आली. याचे श्रेय मी विद्यापीठातील कुलगुरुंपासून विद्याथ्र्यांपर्यंत सर्वांना समर्पित करतो असे भावोद्गार प्रा. मनिष जोशी यांनी या प्रसंगी केले.

महाराष्ट्र स्टेट गर्वमेंट स्टेनोग्राफर मोफुसील संघटना जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ वडनेरे, सचिव डॉ. महेंद्र महाजन, राजेश बगे, चित्रांगा चौधरी, गुलाबराव बोरसे, प्रज्ञा टोणगांवकर, चंद्रकांत नेरपगार, संतोष गव्हाले, प्रकाश वसावे, मिताली देशमुख, गुलाब पाटील, भागवत बडगुजर, ईश्वर सामुद्रे, महेश पाटील, रमेश गांगुर्डे, गजानन साळवे, जगदीश शिवदे, जितेंद्र गोहील, रुपेश धुमाळ, दिपक अलाहित, रेखा तायडे आदिंच्या हस्ते प्रा. मनिष जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.