छत्रपतींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा जाहीर निषेध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून चुकीचा संदर्भ देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमानास्पद विधान केल्याचे निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे निवेदन सादर करून, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे संदर्भात औरंगाबाद येथील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे गुरू संत रामदास होते, रामदास नसते तर शिवाजी महाराज झाले नसते असे त्यांनी कपोलकल्पीत विधान करून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नसून पुर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे.

असा चुकीचा संदर्भ देणाऱ्या राज्यपालांचा महाराष्ट्र जय क्रांती मोर्चाने निषेध नोंदवत इतिहासाची चुकीची व खोटी मांडणी करणाऱ्या अशा राज्यपालावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी व त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी मुकुंद सपकाळे, रमेश सोनवणे, भारत ससाणे, चंदन बिराडे, महेंद्र केदारे, दिलीप सपकाळे, बाबुराव वाघ, वाल्मिक सपकाळे, अमोल कोल्हे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, जगदीश सपकाळ, साहेबराव शिरसाठ, चंद्रकांत नन्नवर, युवराज सुरवाडे, फाईम पटेल, सचिन बिराडे, भारत सोनवणे, पितांबर अहिरे आदी उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.