उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताय ? तर ही बातमी नक्की वाचा

0

मध्यप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्ही मध्यप्रदेशमधील उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण आजपासून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे. यासाठी मंदिर समितीने तीन मुख्य दरवाजांवर हायटेक व्यवस्था केली आहे.

महाकालेश्वर मंदिर परिसरात फिल्मी गाण्यांवर रील बनवणे, वादग्रस्त छायाचित्रे काढणे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे महाकालेश्वर मंदिरात २० डिसेंबरपासून मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय महाकालेश्वर मंदिर समितीने गेल्या बैठकीत घेतला होता. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू होणार आहे.

उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकालेश्वर मंदिर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. महाकालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या तीनही दरवाजांवर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक मोबाईलशिवाय मंदिरात पोहोचले तर मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्याच्या औपचारीकतेतून त्यांची सुटका होणार आहे. यानंतरही मोबाइल घेऊन येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने बनवलेल्या लॉकरमध्ये मोबाइल ठेवावा लागेल, त्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.