रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शासकीय रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जात असताना एएसपी अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने कारवाई करून 16 लाख रु. मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंबरखेड ते आडगाव रोडलगत निलेश ऊर्फ पप्पू सुरेश वाणी यांच्या मालकीच्या गोडावुनमध्ये माल ट्रक क्रमांक एमएच-१८ असी-१९११ मध्ये बेकायदेशिर रित्या शासकीय वितरण प्रणालीचा तांदुळ भरुन खुल्या बाजारात विक्रीसाठी घेवुन जात असल्याची गुप्त माहिती दि. १५ डिसेंबर रोजी रात्री सहापोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव उपविभाग यांना मिळाली.

या गुप्त माहितीनुसार, एएसपी अभयसिंह देशमुख यांच्यासह एएसआय भाऊसाहेब पाटील, पोहेकॉ संदीप पाटील, पोकॉ अमोल पाटील, तसेच तहसिलदार अमोल मोरे चाळीसगाव, तलाठी दिनेश येडे, तलाठी रवींद्र ननवरे, वाहन चालक मिर्झा व दोन पंच तसेच सपोनि विष्णु आव्हाड, पो.उप निरी.प्रकाश चव्हाण, निलेश लोहार, संजय पाटील यांच्या पथकाने दि.१६ डिसेंबर रोजी रात्री छापा टाकला.

दरम्यान ट्रक क्रमांक एमएच-१८ ओसी-१ १-१९९१ मध्ये बेकायदेशिर रित्या शासकीय वितरण प्रणालीचा तांदुळ आढळुन आला. सपोनि विष्णू आव्हाड यांनी पंचनामा करून सदरचा ट्रक डिटेन केला. त्यानंतर पुरवठा निरीक्षक, राजेंद्र रामदास ढोले (वय ५५, धंदा. नोकरी पुरवठा निरीक्षण अधिकारी, चाळीसगाव जि. जळगाव) यांनी खात्री करून नमुणे तपासणी करून सविस्तर पंचनामा व अहवाल तयार करून मालट्रकमध्ये तसेच खाजगी गोडावूनमध्ये मिळुन आलेल्या एकुण ४,५६,३९०/- तांदुळ ट्रकमध्ये तसेच ९,५०,०००/- रूपये किंमतीची मालट्रक तसेच, २,१४,५६०/- रूपये किमंतीचा तांदुळ गोडावूनमध्ये असा एकूण १६,२९०९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी निलेश उर्फ पप्पु सुरेश वाणी आणि रफीक शहा गफ्फुर शहा (ड्रायव्हर) दोन्ही रा. उंबरखेड यांच्या विरूध्द जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे आज दि. २० रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला राजेंद्र रामदास ढोले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एसडीपीओ ऑफिसचे राजेंद्र निकम, संभाजी पाटील, महेश बागुल, गणेश नेटके यांनी देखील तपासात मदत केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस अधिक्षक जळगाव, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव व सहाय्यक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरीक्षक प्रकाश चव्हाण हे करीत आहेत. तसेच गोपनीय माहिती द्यावयायची असल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चाळीसगाव उपविभाग येथे संपर्क साधण्याचे आवाहन अभयसिंह देशमुख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.