मूळजी जेठा महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मूळजी जेठा महाविद्यालात नेशनल डीझास्टर रेईस्पोंस (NDRF) पुणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा राष्ट्रीय छात्र सैनिक आणि एन.एस.एस. स्वयंसेवकांसाठी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

एन.डी.आर.एफ पुणे येथील ५ बटालिअनचे टीम कमांडर इन्स्पेक्टर अर्खीता जेना यांच्या नेतृत्वात ही कार्यशाळा पार पडली. यात ए.एस.आय. एस.जी. इंगळे, हवालदार राजेंद्र पाटील, हवालदार शरद पवार, कॉन्स्टेबल माधव झा इत्यादी यांनी आपत्ती व्यवस्थापनेचे अनुभव, बारकावे तसेच प्रत्याशिके या कार्यशाळेत प्रशिक्षणा दरम्यान दिलेत.

कार्यक्रमाच्या उद्दघाटन प्रसंगी प्राचार्य प्रोफेसर एस.एन. भारंबे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची गरज आणि दृष्टीकोन विषद केले. तसेच एन.सी.सी अधिकारी लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन पहिले. तर एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे यांनी आभार मानले तर सी.टी.ओ. गोविंद पवार यांनी प्रत्याशिके तयार करण्यात योगदान दिलेत. डॉ. एल.पी. वाघ, प्रा. विजय लोहार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here