रायसोनी महाविद्यालयात दांडिया नाईट; अभिनेत्री रागिणी खन्ना सोबत तरुणाईची म्युझिकल मस्ती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय प्रायोजित धम्माल- दांडिया नाईटमध्ये हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी युवक-युवती सोबत बॉलीवूड व टीव्ही अभिनेत्री “रागिणी खन्ना” दांडियाच्या तालावर मोठ्या उत्साहाने थिरकली व विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरणाला भरभरून दाद दिली. बॉलीवूड अभिनेत्री रागिणी खन्ना यांच्या खास उपस्थितीतील हा सोहळा अनेकासाठी डोळ्याचे पारणे फेडणाराच ठरला.

रागिनी खन्ना ही एक भारतीय सिने व टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने टीन द भाई, भजी इन प्रॉब्लेम या सिनेमात तसेच स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ससुराल गेंदा फूल या मालिकेत मुख्य भूमिका केली आहे तसेच ती सुपरिचित अभिनेता गोविंदा याची भाची व कृष्णा अभिषेक (कॉमेडी सर्कस) यांची बहिण आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या या कार्यक्रमात रागिणी खन्ना यांना आमंत्रित करण्यात आले होते. खन्ना यांना आपल्यामध्ये पाहताच युवक युवतीमध्ये मोठा उत्साह संचारला यावेळी सेल्फिसाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. पारंपारिक वेशभुषेतील युवक-युवती मोठ्या संख्येने या धम्माल- दांडिया नाईटमध्ये सहभागी झाले होते.

या दांडिया नाईटचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्युटचे उपाध्यक्ष अविनाश रायसोनी यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, भारती रायसोनी, रोहन रायसोनी, राजुल रायसोनी आदींसह विद्यार्थी युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभुषेत विद्यार्थी युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयासोबतच जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी दांडियाचे ग्रुप सहभागी झाले होते. या दांडिया नृत्य सोहळ्यात रायसोनी संस्थेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याठिकाणी सर्वांसाठी फूड काउंटर्सची सोय देखील करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व प्रमुख संयोजक प्रा. श्रिया कोगटा, प्रा. श्रद्धा काबरा, प्रा. वसिम पटेल हे होते तर प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. भाग्यश्री पाटील यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायसोनी इन्स्टिट्यूटच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दांडिया स्पर्धेतील विजेते

या दांडिया स्पर्धेत साहिल मनवानी याने दांडिया किंग तर सिमरन चावला या विद्यार्थी दांडिया क्वीन हे सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकावले, तसेच उत्कृष्ट जोडी स्पर्धेत अक्षय भोळे व रिंकी कुकरेजा, बेस्ट दांडिया प्लेयर पवन चव्हाण व कांचन माळी व सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत भारत गेही व लक्ष्मी मंधान यांना प्रथम बक्षीस मिळाले. तर रायसोनी इस्टीट्युटच्या कर्मचाऱ्यांमधून मयुरी चौधरी व प्रा. भाग्यश्री पाटील यांना दांडियाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.