लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत; तामिळ नेत्याच्या खळबळजनक दावा…

0

 

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क:

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम या संघटनेचा संस्थापक अर्थात लिट्टे (LTTE) या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून गणले जाते. लिट्टे संघटनेने श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागाला स्वतंत्र्य तामिळ राज्य करण्याची मागणी केली होती. लिट्टे या संघटनेने तीन दशकाहून अधिक काळ लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यासाठी श्रीलंकेच्या सैन्याने २००९ मध्ये राबविलेल्या अभियानात प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होतं.

दरम्यान लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याच्या तामिळ नेत्याच्या दाव्यावरून खळबळ उडाली आहे. जागतिक तामिळ परिषदेचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी तामिळनाडूत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. नेदुमारन यांनी सांगितले की, मी पुष्टी देऊ शकतो की, लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आहे. प्रभाकरन यांच्या जिवंत असल्याचा खुलासा हा त्यांच्या कुटुंबाच्या सहमतीने करत आहे. लिट्टे प्रमुख प्रभाकरन हे जिवंत आणि निरोगी आहेत. ते लवकरच समोर येऊन नव्या योजनेजची घोषणा करतील’.

दरम्यान, नेदुमारन यांनी पुढे सांगितले की, ते प्रभाकरन यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होते. त्यांनी प्रभाकरनच्या तब्येतीची माहिती कुटुंबाला दिली. त्यांना या धक्कादायक दाव्यासाठी लिट्टे नेत्याकडून समर्थन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

नेदुमारन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय स्थिती आणि श्रीलंकेतील (Srilanka) राजपक्षे राजवटीविरुद्ध सिंहली लोकांच्या बंडखोरीमुळे प्रभाकरन बाहेर येण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच जगभरात श्रीलंकेचे तामिळ लोक प्रभाकरनला पाठिंबा देण्यासाठी एकजूट होत आहे. त्यांनी तामिळनाडू सरकार , राजकीय पक्ष आणि तामिळनाडूतील (Tamilnadu) जनतेला प्रभाकरन यांच्या सोबत उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.