मोठी बातमी.. घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाढत्या महागाईच्या काळात मोठी दिलासादायक बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरीक बेजार झाले होते. त्यातच मोठी बातमी आली आहे. अखेर सर्वसामान्यांची महागाईच्या तक्रारीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कोणाला होणार फायदा

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना होईल, अशीदेखील माहिती जारी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.