सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ, पहा जळगावातील दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोने – चांदीच्या दरात नेहमी बदल होत असतात.  उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आज सोने – चांदीच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,०५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,८४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,१२९ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,१२९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,१२९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,१२९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०५० रुपये आहे.

जळगाव शहरातील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे दर ६०३५० रुपये आहे. तर चांदीचे दर  ७५४०० रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.