खळबळजनक; प्रेयसीच्या मृत्यूच्या धक्क्याने प्रियकराची आत्महत्या…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पिंपरी चिंचवड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात अल्पवयीन मुलीचा मृत्यू नंतर तिच्या प्रियकराच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांत या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवडच्या खरांळवाडी अल्पवयीन मुलीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.

जयेश आणि संशयित मृत्यू झालेल्या मुलीचे प्रेम संबंध होते. आत्महत्या करण्यापूर्वी जयेशने मिस यू डार्लिंग, का सोडून गेलीस तू या आशयाच्या पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्या होत्या. या आत्महत्या प्रकरणाची पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडमधील या मुलीचा पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये एका इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्याआधीच मुलीच्या प्रियकराने देखील आज संध्याकाळी आत्महत्या केली आहे. खरांळवाडी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जयेश या तरुणाने आत्महत्या केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.