नियम आम्ही फाट्यावर मारलेत…!

0

लोकशाही विशेष लेख

 

जळगाव (Jalgaon) या नावाचा आपण जर अर्थ पहिला तर तो संस्कृत भाषेत जळ-पाणी, म्हणजेच पाण्याचे गाव असा होतो. परंतु मार्च महिना चालू झाला की, आपल्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सूर्य आग ओकताना दिसतो. नाही नाही म्हणता जळगावचे तापमान ४६ सेल्सिअस, कधी कधी तर ४८ सेल्सिअस पर्यंत जाते. या अचानक वाढलेल्या उकाळ्यापासून सुटकारा मिळवण्यासाठी आणि जिवाची होणारी लाही लाही, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे प्रयत्न जळगावकर करतात. यात कोणी लिंबु पाणी, थंडगार ताक, लस्सी, मावा कुल्फी, नारळाचे पाणी यातून शरिराला ‘थंडक’ देतात. पण बहुतांश जळगावकर हे उसाचा रसच पिणे पसंत करतात. याचं प्रमुख कारण त्याची किंमत आणि गोडवा आहे.

आज जर आपण पाहीलं तर काही वर्षांपूर्वी फार क्वचितच उसाच्या गाड्या होत्या. ज्यात मुख्य गजबजलेल्या चौकात एक उसाच्या रसाचा घाना असायचा. त्यात एका बैलाच्या साहाय्याने रस काढला जात असे. पण जसजसे तंत्रज्ञान पुढे गेले तसतसे बैलाची जागा मशीनने घेतली. आत्ता तर जळगावकरांनी वेगळीच शक्कल लढवून स्वयंचलित उसाच्या रसाच्या गाड्या बनवल्या ज्यात रसाची गाडी एका ठिकाणी न राहता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रस काढतात. यामुळे विक्री कारण्याऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ लागला. रस विक्रेते थेट ग्राहकांपर्यंत पोहचू लागले.

हे जरी फायद्याचे असले तरी मुळात या सवयंचलित उसाच्या रसांच्या गाड्याची बांधणी अवैध आहे. या गाड्याची निमिर्ती पुर्णतः जुगाडी आहे. या गाड्या कुठल्याही शासकीय यंत्रणेच्या प्रमाणित नाही. या गाड्यांचा पूर्णतः ढाचा जुगाडी पद्धतीने बनवला गेलाय. त्यात कुठल्याही प्रकारचे प्रमाणित तंत्रज्ञान नाही. संपूर्ण ढाचा लोखंडी असून जनरेटरच्या माध्यमातून रसाच्या मशीनद्वारे गाडीला गती देण्यात येते. आणि त्यामध्ये स्पीडवर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था नाही. अजुन हे गाडी चालक अधिकाधिक धंदा व्हावा यासाठी आपल्या गाड्या वेगाने हाकतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणेज हे वाहन चालवणाऱ्यांजवळ कुठल्याही प्रकारचा विशिष्ट चालक परवाना नाही. कुठल्याही उसाच्या गाडीला विशिष्ट प्रकारचा नंबर नाही. गाड्याची शासन दरबारी कुठल्याही प्रकारची नोंद नाही. जर काही अपघात झाला तर सामान्यांनी ती गाडी कशी ओळखायची? हा एक सवाल बनून आहे. शिवाय गाडीवर असणाऱ्या मशीनच्या धुरामुळे आणि आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. या गाड्यांवर बालकामगार देखील काम करत असल्याचे सर्रास आपणस दिसते.

मुळात ह्या गाड्या बनवणारे राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील असून जळगावात या गाड्या ६० ते ७० हजारात विकत मिळतात. जळगावकर स्वंयरोजगारासाठी त्या विकत घेतात. जर उद्या उठुन ह्या गाड्यावर कारवाई झाली, तर यात या गरिब लोकांचीच फसवणुक होईल यात तिळमात्र शंका नाही. मुळात ह्या गाड्या बनवणाऱ्या कार्यशाळांनीच या सर्व वाहतुक नियमांना फाट्यावर मारलेलं दिसतं. मग यावर प्रश्न अशा उपस्थित होतो की, हे सर्व नियम फाट्यावर मारणार्यायवर नियंत्रण मिळवणारे वाहतूक अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस हे झोपेचे सोंग का घेत आहेत? आणि तसे नसेल तर त्यांनी निश्चितच ह्या नियम फाट्यावर मारणाऱ्यांकडून काही चिरीमिरी सुरु केली असेल का? प्रश्न जरा गंभीर आहे…!

हर्शल सोनार

Leave A Reply

Your email address will not be published.