प्रेम समर्पित जीवनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – राधा..!

0

भगवान कृष्णाचे अतिशय प्रिय असे तीन जण म्हणजे प्रेम ज्ञान व समर्पण भक्तिचे प्रतिक असलेले उध्दव, राधा आणि सुदाम यांनी भगवंताला प्रेमभक्तिने बांधून घेतले होते. उध्दव ज्ञानवंत, प्रज्ञावंत होते. परंतु त्यापेक्षा सुदामाने आपले संपूर्ण जीवन भगवंताला समर्पीत करुन टाकले होते. भक्ति प्रेम व अंतर्मनाच्या गाभाऱ्यात जीणं भगवंताला वश करुन ठेवले ती म्हणजे राधा. अक्षय तृतीया सणापासून त्रेतायुग प्रारंभ होते असं महाभारतात महर्षी व्यासांनी म्हटले आहे.

कृष्णभगवान यांचा अवतार त्रेतायुगात झाला. मथुरा-वृंदावन, गोकुळ ही स्थाने कृष्णलिलांनी पावन झाली. उत्तरार्धात व्दारकापुरी येथूनच भगवतांनी आपले अवतार कार्य संपवले. भगवान कृष्णाच्या नावापुढे राधाकृष्ण हे नाव का लागले कसे लागले या विषयी वाचकांमध्ये बऱ्याच प्रमाणात आजही संभ्रम आहेत. गोकुळात नंद- यशोदेच्या घरी भगवान कृष्णांचा रोहिणीच्या उदरी जन्म झाला. ‘यदा यदा ही धर्मस्थ’ या गीतेच्या ओवीनुरूप पृथ्वीतलावर कंस, चाणुर, नरकासुर, लवणासुर आदि राक्षसांचा धुमाकुळ वाढला.

ज्ञानवंत, प्रज्ञावंत, किर्तीवंत मानसाला प्रेमभाव असला तर त्याला ही भुषणे शोभीवंत दिसतात. जगात प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे प्रेम नसेल तर जीवन जगण्यालाही काही अर्थ नाही. पोटातल्या संततीवर गर्भार आईचं केवढं प्रेम असतं म्हणून ती प्रेमाने प्रसव वेदना सहन करते.. ।

गो-ब्राम्हण दु:खी झाले. पृथ्वीवर सगळीदूर हा:हाकार माजला. साऱ्या सृष्टीत अखिल ब्रम्हाडांत ‘त्राही माम्‌ – त्राही माम्‌’ अशी बिकट अवस्था झाली. कृष्णपक्षात श्रावण कृ॥ अष्टमीला मध्यरात्री 12 वाजता यमुना दुथळी भरली होती. इकडे मथुरेच्या कारागृहात देवकी मातेसमोर 8 वर्षाची शंख, चक्र, गदा, पदम्‌ अशा आयुधांनी युक्त अयोनीसंभव मूर्ती प्रकट झाली. बाहेर पाऊस सुरु होता. बंदीवान झोपेत घोरत पडले होते. वसुदेवांना जाग आली त्यावेळी भगवान कृष्णांनी त्यांना सांगितले की, मला तातडीने गोकुळा न्या तिकडे रोहिणीच्या पोटी कन्यारत्न जनमाला आले ती आदिमाया शक्ती होती. बंदीवासातून बाहेर आलेल्या वसुदेव कृष्णांवर शेष नारायणाने आपला फणा उभा केला. त्यामुळे पाऊस लागला नाही पण नदीपार करतांना वसुदेव पाण्यातून जात असतांना भगवात कृष्णांनी उजवा पायाचा अंगठा यमुनेच्या जळाला लावला आणि तीने वाट करुन दिली.

गोकुळात रोहिणीला गर्भवास होता पण यशोदा माते जवळ कृष्ण भगवंताना ठेऊन रोहिणी जवळ खेळत असलेली आदिमाया उचलली आणि ते बंदीवासात आले. पुन्हा जैसे थे अशी स्थिती झाली. येथून कृष्णांच्या बाललिला सुरु झाल्या. नंद यशोदेकडे गोपी गौळणी गाऱ्हाणे करु लागली. या बालअवस्थेत पुतणेचा वध करुन कृष्णाने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. यशोदेने भगवान कृष्णांना जन्म दिला नाही तरी तीचे प्रेम देवकीपेक्षा काकणभर सरस राहिले. भगवंत भावाचा प्रेमाचा भुकेला आहे. भगवान कृष्णांनी एकदा माती खाल्ली असे बळीराम दादांनी यशोदा मातेला सांगितले. नंतर आपले मुख ‘आ’ करुन कृष्ण भगवंताने मातेला विश्वदर्शन घडविले. हे पाहून यशोदामाता भयकंपीत झाली. उध्दव अक्रुर गमन पर्व सुरु झाले की, मथुरेत कृष्णाच्या हातून कंस व इतर राक्षंसाचा नि:पात होतो.

कृष्णलिला दरम्यान शरद पौर्णिमेच्या रात्री रासक्रिडा खेळून भगवान कृष्णाने गोपीकांना आपल्या हृदयात स्थान दिले. सुदाम गरीब ब्राम्हण सदैव उठता बसता ‘जय श्रीकृष्ण’ नामजप मुखी … कर्म करतांना फक्त ५ घरांना भिक्षा मागून उदर निर्वाह करतांना आपला सखा आपला भगवंत या समर्पण भावनेने जीवन जगणारा.. उंची ऐशोआरामात विद्याभ्यासाच्या जोरावर ज्ञानवान उध्दवाला प्रेम कळलेच नाही ? त्यावर सुदाम म्हणतात हे उदध्वा – “चक्रवर्ती सम्राट होऊन देश जिंकणे सोपे पण एखाद्याचे प्रेमाने मन जिंकणे कठीण ….।”

राधा ही भगवान कृष्णाची प्रचिती ….राधा आणि ‘धारा’ शब्द उलट केले तरी संदर्भ बदलतो. राधेने वासनारहित अंत:करणाने भगवंताला जिंकले म्हणून सर्व गोपीकांमध्ये राधा श्रेष्ठ ठरली ..! राधेच्या भक्तित त्याग प्रेम व अनुराग होता म्हणून भगवंताने आपल्या नावापुढे राधेकृष्ण असे लिहले. आजही व्दारका नगरीत राधे -राधे म्हणूनच नमस्कार, अभिवादन करण्याची प्रथा आहे. राधे गोविंद…राधे गोविंद…॥ उत्तर हिंदुस्थानात मथुरेत राधे राधे सांप्रदाय फार मोठा आहे…..।

रमेश जे. पाटील
आडगाव ता. चोपडा जि. जळगाव
मो.9850986100

Leave A Reply

Your email address will not be published.