Browsing Tag

Ramesh J patil

जाता पंढरिसी सुख वाटे जीवा । आनंदे केशव भेटतांचि.. ॥

लोकशाही न्यूज नेटवर्क  वारकरी संप्रदायातील संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा हा भावपूर्ण अभंग पंढरपूरचे महिमा वर्णन करणारा 'संताची अभंगवाणी' या पुस्तकातला आहे. संत सेना महाराज वारकऱ्यांना या अभंगाव्दारे सांगतात. जीवाला आनंदाची प्राप्ती हवी…

संत चरण रज सेवीता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय ||

संतांची आवडती भजने या हभप रंगनाथ महाराज खरात त्यांनी प्रकाशित केलेल्या सांप्रदायिक पुस्तकात संत सेवेचे महत्त्व तुकाराम महाराजांनी विशद केले आहे. संतांच्या पायाची धूळ मस्तकी लागली तरी पुण्य प्राप्त होते. अंतकरण शुद्ध होते. वासनेचे बीज जळून…

हे शिवपीठ शिवाचे | हेची पूर्वस्थान अगस्तीचे | असे क्षेत्र आळंदी

साक्षात भगवान भवानी शंकराच्या वास्तव्याने पुनीत व अगस्ती ऋषींसारख्या सिद्ध महामुनींची तपसामर्थ्याने पावन झालेली पुण्यशील पुण्यभूमी म्हणून नावाजलेली अलंकापुरी म्हणजेच आळंदी. या सर्व तिथींची आदीभूमी म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. आळंदी हे…

राम म्हणता न लगे आणिक सायास | केले महादोष तेही जळती.. ||

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान यांचं नाव घेतल्याबरोबर भूत पळून जातात. मोठमोठी पापे नाहीशी होतात. राम-राम म्हणतांना यम देखील अशा व्यक्तीला घाबरून जातो. एवढे सामर्थ्य राम नामात आहे. कलियुगात संत रामदास स्वामींनी राम-हनुमंत यांची…

अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र..!

देवाची आळंदी म्हणजे अलंकापुरी जेथे ज्ञानदेवांनी समाधी घेतली त्या योगींचे हे गाव. जगाची माऊली म्हणून विश्वबंध अशा ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपीका या दोन ग्रंथाची निर्मिती करून अध्यात्म ज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. त्यायोगेच भागवत…

आला स्वइच्छा पंढरपुरा । सोडूनिया क्षीरसागरा : पंढरिनाथा ||

श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक भगवान महाविष्णु क्षीरसागरी शेषशय्येवर पहुडले आहेत. माता लक्ष्मी हळुवारपणे चरणसेवा करीत आहेत. भगवंताचं आपलं स्वतःचं असं एक ब्रीद आहे. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर पाप वाढेल गो ब्राम्हण दुःखी होतील दुराचारी…

ऐसा ठाव नाही कोठे । देव उराऊरी भेटे । ते क्षेत्र पंढरी ॥

पंढरपूर हे भू लोकिचे वैकुंठ आहे. दिंडीरवन, पांडूरंग नगरी, पंढरी अशी नामभिदाने या तीर्थक्षेत्राला लाभली. श्री विठ्ठलाच्या विश्वव्यापक अनुभूतीतून भाविक भक्तांना याचा प्रत्यय आला आहे. येथील देव साक्षात महाविष्णुचा अवतार असून क्षीरसागरात शेष…

तरु शिखरावर कोकिळ कविने पंचमस्वर लावला …..!

राजव्दारी घडे चौघडा शुभत्कार जाहला उठी उठी गोपाळा... उठी उठी गोपाळा ...! पहाट ... भाग्यवंत पुण्यवंताची ... पहाट नवचैतन्याची, पहाट सृष्टीला सौंदर्य प्रदान करणारी, ब्रम्हमुहूर्ताच्या सुमधूर भावविश्वाने उजळून निघणारी अशा या सुरम्य पहाटे…

शोधितां न सापडे वेदशास्त्रा | दृष्टी न पडे व्दिसहस्त्रनेत्रा | पंचमुखा दुर्लभ … !

भगवान कृष्ण वेद शास्त्रांना न सापडणारा, दोन हजार डोळ्यांचा शेषशायी ज्याने ही पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशा रामअवतारातील लक्ष्मणला व कृष्ण अवतारातील बळीभद्राला एका ठिकाणावर दिसत नाही. ब्रम्हदेवाने कितीही शोध घेतला त्यालाही न…

अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण ब्रम्हवादिनी मुक्ताई..!

मानव मात्रांना आत्मघातक व समाज विघातक आत्मविस्मृतीच्या अध:पतनातून किंकर्तव्यमुढ झालेल्यांना झगझगित प्रकाश मार्ग दाखविण्यासाठी संताचा जन्म होत असतो. संत अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण असतात मुक्ताई देखील अशाच संत व ब्रम्हवादिनी…

जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥

संत एकनाथ महाराज यांनी आपल्या हरिपाठात अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लोकांना भक्तिमार्ग सांगितला आहे. आपल्या दोन्ही डोळयांनी आपण जे पाहतो ते ते हरिरुप आहे आणि हे पाहायला ध्यान जप तप काहीही करावे लागत नाही. डोळे फक्त उघडे करुन चराचर सृष्टी…

आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यातून काढील तोची ज्ञानी…॥

संत तुकोबांचे अभंग म्हणजे समाजाला सुचवलेलं शहाणपण.. अंध:कार ज्ञान, घन यांच्या मदात उन्मत झालेल्यांना जागे करुन ते सन्मार्गाला लागण्यासाठी केलेला खटाटोप... तुकोबा ज्ञानोबांच्या अभंगानी समाजातलं पाखंड खंडण करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन…

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटी देह तैसा ।।

पंचरत्न हरिपाठ म्हणजे हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, मोती ठेवण्याची एक छोटीशी पेटी. भागवत धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री. ज्ञानदेव, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज व श्री. निवृत्तीनाथ या पाच संतांनी ही पेटी…

अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वर बासरी: नाम त्याचे श्रीहरी रे…श्रीहरी..!

मानवी देहात प्राण रुपी अदृश्य श्वास फुंकण्याचे काम भगवंत करीत असतो. पहाटे रामप्रहरी लवकर उठल्यावर अंथरुणावरुन अंग सोडण्यापूर्वी दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासतांना "प्रभाते मनी राम चिंतीत जावा". आपल्या इष्टदेवतांचं स्मरण करतांना हे देवा,…

प्रेम समर्पित जीवनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – राधा..!

भगवान कृष्णाचे अतिशय प्रिय असे तीन जण म्हणजे प्रेम ज्ञान व समर्पण भक्तिचे प्रतिक असलेले उध्दव, राधा आणि सुदाम यांनी भगवंताला प्रेमभक्तिने बांधून घेतले होते. उध्दव ज्ञानवंत, प्रज्ञावंत होते. परंतु त्यापेक्षा सुदामाने आपले संपूर्ण जीवन…

शुकादिक मुनि विरक्त संसारी । रामनाम निर्धारी उच्चारिले ॥

पंचरत्न हरिपाठ म्हणजे पाच तत्वांचा मेळ, पृथ्वी, वायु, तेज आकाश व पाणी यांनी मिळवून जगत्‌ नियंत्याने आदिमाया शक्तीच्या सहाय्याने या भुतलावर सुंदर नरदेह रुपी स्त्री-पुरुष या दोघांची निर्मिती केली. निसर्गरम्य सृष्टी निर्माण करतांना विविध…

दुग्धीच नवनीत असे हे आबालवृद्ध जाणतसे। परी मंथनविण कैसे । …

हरीविजय ग्रंथाचे कवी श्रीधर स्वामी यांनी पहिल्या अध्यायात मनुष्य जीवनाचे सार अत्यंत सोप्या शब्दात मांडले आहे. गुरुवंदनेचा हा अध्याय अध्यात्म ज्ञानासाठी संजीवनी आहे. व्यास नारदासी शरण रिये । इंद्र बृहस्पतीच्या पायां लागे ॥ उमा शिवासी शरण…

अनंतासी अंत पाहतां नाही । आदि मध्य अंती हरि एक ॥

अनंत कीर्ती  नामे । अनंतासी अनंत तो एक हरि ॥ शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा पंचरत्न हरिपाठातील हा अभंग ....! भगवंत काय असतो ? तो कसा आहे ? सगुण निर्गुणाच्याही पलिकडे असलेला हा परमात्मा कळला, वळला, आकळला तो फक्त संतांना .....! कलीयुगात…

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥

पंचरत्न हरिपाठातील मागणीपर अभंगात नामदेव महाराजांनी भक्तांसाठी देवाकडे जे मागणे मागितले आहे ते अलौकिक व अपरिमित आहे. पंचरत्न हरिपाठ म्हणजे वारकरी सांप्रदायाची एक छोटी खिशात मावेल एवढी भगवतगीताच…। हरिपाठाचे अभंग म्हणजे भगवंताचं चिंतन.. या…

श्री गुरुचरित्र कामधेनू जाण : तुची एक कृपासिंधु ….!

बावन्न श्लोकी गुरुचरित्र या छोट्याश्या पुस्तकात गुरुंचा महिमा व दत्त अवताराचे महत्व विषद करण्यात आले आहे. तिन मुखांचा दत्त त्रिगुण गुणांचे सत्व, रज, तम यांनी युक्त होते. सगुण भक्तित आजही गुरुचरित्र घराघरात पारायण करुन वाचले जाते.…