आ. अनिल पाटलांचे अभिनंदन..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने अमळनेरचे एकमेव आ. अनिल भाईदास पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी घेतलेल्या नऊ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये समावेश झाला. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटी संदर्भात हा पक्षातील अंतर्गत मामला आहे. तथापि २०१९ मध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची पहाटे शपथविधी झाला होता, तेव्हा सुद्धा अजित पवारांबरोबर जाणाऱ्या आमदारांमध्ये अनिल भाईदास पाटलांचा अग्रक्रम होता. तेव्हापासूनच आ. अनिल भाईदास पाटील हे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत, हे स्पष्ट झाले होते. नुकतेच अंमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलतर्फे जे ग्रंथालय अधिवेशन झाले त्या कार्यक्रमाला शरद पवार, जयंत पाटलांचा समावेश अजित पवारांची खास उपस्थिती होती. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी अमळनेरला एक दिवसांचा मुक्कामही ठोकला होता. त्यावरून अजित दादांचे आ. अनिल भाईदास पाटलांना विशेष प्रेम असल्याचे स्पष्ट होते. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आ. अनिल भाईदास पाटील यांची निवड करून आ. अनिल पाटलांमध्ये पक्ष संघटनेचे नेतृत्व गुण असल्याचे स्पष्ट करून अनिल भाईदास पाटलांची राष्ट्रवादी पक्षात किंमत वाढलेली दिसली. त्याचाच परिणाम म्हणजे आ. अनिल पाटलांना वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समावेश उत्तर प्रदेशात पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आ. अनिल भाईदास पाटलांच्या नावाला अग्रक्रम देण्यात आला होता, अशी चर्चा होती. तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीची उमेदवारी अनिल पाटील ज्यांचे नाव सुचवतील त्यांना देण्यात येईल असेही पक्ष नेतृत्वाने निर्णय घेण्याची चर्चा होते. त्यामुळे अनिल भाईदास पाटील यांनी त्यांची धर्मपत्नी जयश्री पाटील आणि माझी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील या दोन नावांपैकी कोणत्याही नावाला पसंती देण्याबाबतही चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल भाईदास पाटील यांची आमदारकीची पहिली टर्म असताना सुद्धा पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आ. अनिल भाईदास पाटील हे पूर्वी पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथापि भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी दिली नाही. त्यांचे ऐवजी तत्कालीन अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भाईदास पाटलांना उमेदवारी दिली आणि शिरीष चौधरींचा पराभव करून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार म्हणून अमळनेर मधून अनिल भाईदास पाटील निवडून आले. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची कट्टर समर्थक समजले जाऊ लागले. तथापि त्यांचे झुकते माफ मात्र अजित पवारांकडे होते एवढे मात्र निश्चित…!

 

बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सोबत आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात आ. अनिल भाईदास पाटलांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा अमळनेर शहर व तालुक्यात जल्लोष झाला. आ. अनिल भाईदास पाटील यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्री मिळाले, ही आनंदाची बाब होय. मंत्रिपद मिळण्यासाठी शिंदे गटातील जळगाव जिल्ह्यातील आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. त्यामुळे त्यांची पार निराशा झाली. विशेषतः पारोळाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील तसेच पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची मंत्री पदाचे स्वप्न आता पूर्णपणे भंगले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार मध्ये अर्थमंत्री असताना आम्हाला निधी दिला नाही म्हणून अजित पवार यांचे विरोधात तक्रारी करून महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना आता अजित पवारांबरोबरच बसावे लागणार आहे हे विशेष. शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या मंत्र्यांच्या टीमसह सामील झाल्याने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी होईल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असे वाटत नाही. त्यामुळे शिंदे गटातील ४० आमदारांची फरफट पुन्हा सुरू होईल, यात शंका नाही. त्यातच १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात सभापती राहुल नार्वेकरांचा निर्णय काय येतो, याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. या १६ आमदारांच्या अपात्र प्रकरणावर जर सभापती कडून शिक्कामोर्तब झाला तर आणखी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल यात शंका नाही. आता शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे लोकसभा मिशन ४८ चे काय होईल, ते पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे अधिकार आणि त्यांचे सोबत झालेल्या गेलेल्या आमदारांचे राष्ट्रवादी पक्षातर्फे जो निर्णय व्हायचा तो होईल, तथापि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळात मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आ. अनिल भाईदास पाटलांचे अभिनंदन. तसेच त्यांना आगामी मंत्रीपदाच्या कार्याला शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.