‘सम्यक श्रद्धा’ परम दुर्लभ बाब

0

[] प्रवचन सारांश 19.10.2022 []

सम्यक श्रद्धा हे परम दुर्लभ मानले गेले आहे. सम्यक श्रद्धा असेल मोक्ष मार्ग सहज प्राप्त होतो. असे पू.जयधुरंधर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात सांगितले.

‘मेरी भावना’ प्रवचन श्रृंखलेत आजच्या प्रवचनात ‘भाग्य’ व ‘पुरुषार्थ’ कोणाला प्राधान्य दिले आहे ! यावर चर्चा करण्यात आली. काल, स्वभाव, कर्म, नियती आणि पुरुषार्थ असे पाच कारण सफलता वा असफललेला कारणीभूत ठरतात. हे पाच संभाय असतात. की आज बी टाकले तर लगेच त्याचा वृक्ष होत नाही. विशिष्ट काळ जाऊ द्यावा लागतो, त्याला काल प्रभाव असे म्हटले जाते. ‘काल’, ‘स्वभाव’ ‘कर्म’, ‘नियती’ आणि पुरुषार्थ असे पाच कारणं सफलता वा असफलतेला कारणीभूत असतात. असे प्रवचनात सांगण्यात आले.

जळगाव येथील आर. सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती १२ वे पटधर आचार्य श्री पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. यात डॉ. पदमचंद्र म. सा. यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर म.सा. ‘आगम शास्त्र’ तर पू. जयपुरंदर. म. सा. यांची ‘मेरी भावना’ प्रवचन माला सुरू आहे. त्याचा लाभ श्रावक-श्राविका घेत असतात.

राजा हरिश्चंद्र यांच्याशी काळ, स्वभाव, कर्म, नियती व पुरुषार्थ यांचे खेळ सुरू होते. ‘स्वभाव’ संभायमुळे कष्ट पुरतात तरी निश्चयापासून दूर जात नाही. प्रवचनात पुढील कथा त्यांनी सांगितली. दोघांनी स्वतःला दास म्हणून विकून टाका असा सल्ला विश्वामित्र ऋषींनी दिला. स्वतःला दास म्हणून विकले. राजा कनिष्ठ कुलाचा सेवक कसा होईल. हा विचार विश्वामित्र करीत होते. परंतु हजार स्वर्ण मोहरा स्वतःला व पत्नीला विकून प्राप्त केल्या व आपला दिलेला शब्द पूर्ण केला, वचन पाळला.  भविष्यात राजा हरिश्चंद्र व राणी तारामती यांच्यावर काय, काय प्रसंग येतात याबाबत मेरी भावना प्रवचनात विवेचन केले गेले. रोमहर्षक अशा या कथानकात पुढे काय घडेल याबाबत उत्सुकता आहेच. पुढच्या प्रवचनात राणी तारामती व राजा हरिश्चंद्र यांची कथा ऐकायला मिळेल.

आगम प्रवचन मालेत पू. जयधुरंधर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात दुर्लभ बाबींवर विश्लेषण केले. ज्ञान, दर्शन व चारित्र हा मोक्षाचा मार्ग होय. ‘सम्यक दर्शन’ याला महत्त्व आहे. नाव आहे पण नाविक नाही तर नदी किंवा समुद्रात तरणे संभव नाही तद्वतच ज्ञान आहे पण श्रद्धा नाही असे असेल तर मोक्ष मार्ग मिळणार नाही. श्रध्दावानाला सर्व प्राप्त होते. ‘श्रदा’ हे परमदुर्लभ मध्ये मानले आहे, श्रद्धा ही तिसरी दुर्लभ गोष्ट आहे. यावर त्यांनी प्रवचन केले. सामान्य श्रद्धा, कुश्रद्धा, अंधश्रद्धा, आणि चौथी श्रद्धा ‘सम्यक श्रद्धा याबाबत सांगण्यात आले. प्रभू महावीर यांच्या निर्वाणाच्या वेळी दिवाळीच्या दिवसांमध्ये अंतिम देशना सांगितली गेली. 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान सर्व श्रावक-श्राविकांनी उपस्थित रहावे हा आवाहन करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.