मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचे चिंतन करावे

0

प्रवचन सारांश 15.10.2022

मनुष्यजन्म हा दुर्लभ असतो. मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचे प्रत्येकाने चिंतन करायला हवे. ह्या विषयी अत्यंत सहज सोप्या पद्धतीने पू. जयधुरंधर म.सा. यांनी ‘आगम शास्त्र’ विषयावरील प्रवचनात समजावून सांगितले.

स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र जी महाराज साहेब, डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे. यात डॉ. पदमचंद्र  म.सा. याचे सुशिष्य जयपुरंदर म.सा. यांचे ‘मेरी भावना’ तर जयधुरंधर मुनी यांचे ‘आगम शास्त्र’ विषयावर प्रवचन सुरु आहे.

आजच्या प्रवचनात ‘अभयदान’ या महत्त्वाच्या विषयावर जयपुरंदर म.सा. यांनी ‘अथवा कोई कैसा भी भय, या लालच देने आवे।” या काव्य ओळींची सोदाहरण चर्चा केली. कोणी किती ही भय दाखविले तरी आपण कोणत्याही परिस्थितीत न्यायमार्ग कधीच सोडू नये, न्याय, सत्य, धर्म म्हणजे राजा हरिश्चंद्र यांचा उल्लेख येतो. त्यांनी आजच्या प्रवचनात राजा हरिश्चंद्र यांचे उदाहरण आवर्जून दिले. त्यांच्या मार्गाशी ते दृढनिश्चयी होते. सत्य व न्यायासाठी एखादी व्यक्ती इतका त्याग करू शकते ते राजा हरिश्चंद्र होय.

राजा हरिश्चंद्र यांची कथा महाराज साहेबांनी सांगितली. राजा हरिचंद्र यांची न्याय प्रिय व योग्य न्याय देणारे राजा अशी ख्याती होती. तर विश्वामित्र ऋषिंची क्रोधी व्यक्ती म्हणून सर्वदूर ओळख होय. मनाविरुद्ध घडले की, विश्वामित्र शाप देत असत. आश्रमातील फूल, वृक्ष अन्य बागेचे नुकसान देवींनी केले. असे करू नका ह्या बाबत देवींना समजावले गेले तरी त्यांनी ऐकले नाही.  विश्वामित्र त्या स्थळी पोहोचले.  तू स्त्री आहेस म्हणून सोडतो नाही तर भस्म केले असते असे कडक शब्दांत सांगून त्या देवींना बंदिवान करून घेतले. राजाला कनव येईल व त्या बंदिवानातील स्त्रियांना सोडून देतील, असे केल्याने विश्वामित्र ऋषि राजा हरिश्चंद्रावर कोपतील हा दृष्टीकोन ठेवला. देवाने राजा हरिश्चंद्र यांना विश्वामित्र यांच्या आश्रमात आणले. बंदीस्त देवींना राजा हरिश्चंद्र याने माझ्या आश्रमात  येऊन का सोडावे ? विश्वामित्र राजावर रागावले. ह्या कथेत काय काय प्रसंग घडतात ? याबद्दल पुढील प्रवचन भागात ऐकायला मिळेल.

डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर म.सा. यांनी आपल्या सुरु असलेल्या प्रवचन मालेतील कालच्या प्रवचनाच भाग पुढे सांगितला. मनुष्यगती म्हणजे जंग्शन होय. चार दुर्लभ गोष्टींची चर्चा प्रवचनात सुरु आहे. “मनुष्य जन्म म्हणजे चिंतामणी रत्न’ होय. मानव मात्रा केवळ झोपण्यात, दिवस खाण्या-पिण्यात व्यर्थ वेळ घालवित आहे. ‘खाणे-पिण्यासाठी विद्यालाही मानव जन्म घेतला?, ‘मौज, शोक, आमोद-प्रमोद साठी मानव जन्म मिळाला?’, ‘धन कमावण्यासाठी मानव जन्म घेतला?,’ ‘परिवार पालन पोषणासाठी जन्म घेतला आहे?” मानवाने पशू सारखे जीवन जगले तर मानवीजन्म मिळून काही फायदा नाही. १६ रोजी “जयमल प्रीमियर लीग – 2022” फायनल धार्मिक स्पर्धा होत आहे त्यास उपस्थित राहयाचे आवाहन  देखील करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.