१४ वर्षीय मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील पंढरपूर नगर येथून १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील पंढरपूर नगरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबियासह राहतो. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अल्पवयीन मुलगा दहा मिनिटात येतो, असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. सर्वत्र शोध घेवून त्याची कुठेही माहिती अथवा तो प्रत्यक्षात मिळून आला नाही.

अज्ञान व्यक्तीने त्याला काहीतरी आमिष दाखवून अपहरण केल्याचा संशय मुलाच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

|

Leave A Reply

Your email address will not be published.