स्वयंदीपने बांधली दिव्यांगांची सप्तजन्माची गाठ

0

लोहारा ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील बालाजी लॉन्स येथे एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कन्यादान आई वडिलांनी नव्हे तर शासकीय अधिकारी यांनी केले. आगळा वेगळा विवाहबद्दल सांगायचे असे की, चि. सौ. का. सरला उर्फ लोचन व चि. भूषण या दोन्ही दिव्यांग दाम्पत्यचा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी आशीर्वाद मूर्ती आदरणीय वर्धमान भाऊ धाडीवाल उद्योजक, दिव्यांग मित्र यांनी पार पाडली. वर वधू यांना कालच्या दिवशी हळद लागल्यानंतर वधू वरात आखतवाडे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून व वर पक्षांकडचे आखतवाडे ता. सटाणा येथून थेट बालाजी लॉन्स धुळे रोड चाळीसगांव येथे आगमन झाल्यावर सर्वांचे डोळे पाणावले कारण वर- वधू हे उभयंत दोन्ही दिव्यांग आणि त्यांच्या स्वागताला स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय मीनाक्षी ताई निकम समवेत स्वयंदीप मधील सर्व दिव्यांग भगिनी तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव मा. विजय रायसिंगसाहेब, दिव्यांग विभाग वैसाका भरत चौधरी साहेब, जिल्हा दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक गणेशकर सर सह वर-वधू कडील मंडळी उपस्थित होती.

सुरवतीला वर-वधू यांचे आगमन झाल्यानंतर दोघांचा विवाह झाल्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग साहेब व वैसाका भरत चौधरी यांनी कन्या दान केले. तसेच पाचोरा पंचायत समिती दिव्यांग कक्षाचे ए. के. महाले यांनीही नवोदित दिव्यांग दांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी विवाहस्थळी हजेरी लावली.

विवाहाची जबाबदारी घेतलेले वर्धमानभाऊ धाडीवाल यांनी भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्यांच्या आग्रहास्तव सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच इतर मान्यवराच्या लग्न सोहळ्यात ह्या आगळ्या वेगळ्या विवाहबद्दल चर्चा विवाह ठिकाणी होत होत्या. व्यंग म्हणून झुगारून नकार देणारे अनेक असतात स्वयं दुःखी यांनी सप्तजन्माची गाठ बांधल्याने उपस्थितांना हा लग्न सोहळा प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की होय.

Leave A Reply

Your email address will not be published.