लोहारा मार्गावर चारचाकी वाहनाची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

पोलीस अपघातानंतर एक तास उशिराने पोहोचले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लोहारा येथील गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर हे नोकरीनिमित्त शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत नोकरीत होते. आपल्या घरून त्यांची दुचाकीवरून (एम एच 19 डी एन 76 62) शेंदुर्णी येथे जात असताना, कळमसरा गावाच्या पुढे एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेंदुर्णी कडून दूध वाहतूक करणारा महिंद्रा पिकप (एम एच सी वाय 5731) या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या मेंदूला जोरात मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.

सादर घटना जवळपास दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा आक्रोश तर नातेवाईकाचा संताप झाला. यात चालक तिथेच हजर राहिल्याने त्याच्या विरोधात नातेवाईकांच्या संतप्त भावना होत्या, तर पोलीस प्रशासनही अपघात होऊन एक ते दीड तास उशिरा पोहोचले. पोलीस प्रशासन आल्याने सदर मयताचा मृतदेह त्यांनी शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेत टाकून नेण्याचे ठरवले. यातही रुग्णवाहिका नातेवाईकांनी दोशी चालक आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचे जाब जबाब आमच्यासमोर घ्या अशी भूमिका मांडून अडवून धरली.

चार चाकीचालक भूषण राजू चौधरी (रा. पाचोरा, कृष्णा रेसिडेन्सी गाडगेबाबा नगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले व दुचाकी स्वराच्या मृत्यूस कारणीभूत धरत, गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी एपीआय अमोल पवार, हेडकॉन्स्टेबल अरविंद मोरे, लोहारा पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी शांतता राखण्याचे काम केले. रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, एक भाऊ, काका, काकू असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.