अय्यंगार स्टाइल रवा केक बनवा घरच्याघरी

0

खाद्यसंस्कृती विशेष

रवा केक खायचा तर अय्यंगारचाच असं आपलं गणित फिक्स आहे. पण केक तर आपल्याला येतातच ना मग रवा केक सुद्धा घरीच बनवला तर.. चला तर मग  अगदी साऊथ इंडियन पद्धतीने अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसाच सेम रवा केक बनवूयात.

साहित्य:

१ वाटी रवा, दिड वाटी दूध, १/२ वाटी साखर,  ५/६ चमचे तेल/ तूप, १ चमचा बेकिंग पावडर, २ चिमूट सोडा, १/२ चमचा वेलची पावडर

कृती :

१) प्रथम रवा मिक्सर मधून एकदा फिरवून घ्यावा.

२) एका बाउलमध्ये दूध आणि साखर मिक्स करुन त्यामध्ये तेल घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.

३) आता रवा चाळून दुधाच्या मिश्रणात घालून चांगले फेटून घ्यावे व सोडा घालून मिश्रण परत एकदा फेटून १/२ तास झाकून ठेवावे.

४) नंतर मिश्रणात बेकिंग पावडर व वेलची पावडर घालून एकजीव करून बॅटर तयार करून घ्यावे.  (गरज लागल्यास थोडे दूध घालावे)

५) केक टिनमध्ये बॅटर घालून रवा केक ओव्हन मध्ये १८० तापमानवर २० मिनिटे बेक करून घ्यावे.

६) कुकर मध्ये बनवायचे असल्यास कुकरमध्ये एक भांडे उपडे ठेवून त्यावर केकचे बॅटर असलेले भांडे ठेवून कुकरची वायर न घालता मध्यम आचेवर २०/२५ मिनिटे केक बेक करून घ्यावा.

आजपासून अय्यंगार बेकरीमधून रवा केक आणायची गरजच नाही. घरच्या घरी अय्यंगार बेकरीच्या रवा केकचा आस्वाद घ्या.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.