कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, वाचा सविस्तर

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या सात कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे.

‘थर्डी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यानुसार नेमलेली ड्युटी सोडून मोबाईल स्विच ऑफ करत सात पोलीस कर्मचाऱ्यांनी दांडी मारली.

दांडी मारणाऱ्या या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी निलंबनाची कारवाई करत कारवाईचा बडगा उगारल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी. या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षणतर्फे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.