हाडांच्या बळकटीसाठी ‘किवी’ आहे फायदेशीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे सांगत घातली तर, आरोग्यह्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत, मात्र, आजकाल वयाची चाळीशी जरी ओलांडाली तरी, शरीराला थकवा येण्यास सुरुवात होते. हाडे कमजोर होऊ लागतात.

सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे देखील फायद्याचे आहे. या रस्ताही किवी हे फळ तुमची मदत करू शकते. किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात तर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. आज आपण हिवाळ्यात किवी खाण्याचे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

हाडे मजबूत होतात

किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचा समावेश आढळून येतो. एक कप किवीमध्ये साधारणपणे ६१.२ मिलिग्रॅम कॅल्शियमचे प्रमाण आढळून येथे त्यामुळे, किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते शिवाय, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी हाडांच्या मजबूतीसाठी आहारात किवीचा समावेश करावा.

रोगप्रतिकार क्षमता वाढते

किवीमध्ये कॅल्शियमसोबतच इतर पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात आपल्या सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.