Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर होणार मंथन…
    जळगाव

    मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर होणार मंथन…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 24, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर मंथन होणार आहे. यासह खान्देशी बोलीभाषा व खान्देशचे साहित्यिक वैभव या विषयांवर साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयाला देखील हात घालण्यात येणार आहे.

    ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय, तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान, स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान, आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का?, खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर), खान्देशी साहित्यिकांचे वैभव, याविषयांवर परिसंवाद होणार आहेत. याशिवाय ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन या विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत होणार आहेत.

    संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रताप महाविद्यालय परिसरात रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी सुरु आहे. मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह इतर कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सभामंडप क्र. १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात सुमारे सात ते दहा हजार प्रेक्षक बसतील, अशा ‘जर्मन हँगर’ पद्धतीचा भव्य असा सभामंडप उभारण्यात येत आहे. सभामंडप क्र. २  कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात अंदाजे ५०० जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही अंदाजे ५०० जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

    #amalner 97th Akhil Bhartiya Sahitya Sammelan Amalner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif