ब्रेकिंग.. किरण बकालेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एलसीबीचे तत्कालीन निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानंतर हायकोर्टानेही फेटाळला आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज औरंगाबाद न्यायालयाने बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज टाकण्यात आला होता. परंतू तेथे देखील आज तो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या वृत्ताला हस्तक्षेप याचिकाकर्ते प्रशांत इंगळे यांनी दुजोरा दिला आहे. त

दरम्यान या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती. यातील दोन पथके नुकतीच रिकाम्या हाती नुकतेच परत आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.