वेध प्राणिविश्वाचा ‘रंगीबेरंगी किंगफिशर’

0

लोकशाही, विशेष लेख

 

किंगफिशर (Kingfisher) पक्षी दिसायला खूप सुंदर असतो. हा लहान आकाराचा पक्षी आहे. सामान्य भाषेत याला राम चिडिया किंवा किल्किला असेही म्हणतात. हा पक्षी मासेमारीत पारंगत असल्यामुले याला किंगफिशर असे म्हणतात. किंगफिशर पक्ष्याचा बराचसा भाग तपकिरी रंगाचा असतो. या पक्ष्याचे पंख चमकदार निळ्या रंगाचे असतात. त्याच्या डोक्यावर निळा धागाही असतो या पक्ष्याचे पाय इतर पक्ष्यांपेक्षा लहान असतात व चोच चाकूच्या आकारासारखी लांब असते. किंगफिशरचे डोळे खूप धारदार आणि तीक्ष्ण असतात त्यामुळे हे पक्षी जास्त कालावधीसाठी पाण्यावरून उडू शकतात.

हे पक्षी खूप चपळ आणि वेगवान असतात. किंगफिशर मुख्यत्वे उंचावरुन शिकार करतात. माशांची शिकार करताना ते पाण्यावर घिरट्या घालतात. जेव्हा त्याना मासे दिसतात तेव्हा ते त्यावर झडप घालून चोचीने पकडतात. हा प्रामुख्याने मांसाहारी पक्षी आहे. जे मासे शिकार करण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहेत. हे पक्षी मासे खाण्यासोबत इतर विविध गोष्टी सुद्धा खातात.

या पक्षांच्या काही प्रजाती मासेमारीमध्ये तज्ञ आहेत, परंतु काही प्रजाती बेडूक आणि इतर उभयचर प्राणी, कृमी, गोगलगायी, कीटक, कोळी, सेन्डिपॉड्स, सरपटणारे प्राणी (साप) हे खातात. हा पक्षी पृथ्वीच्या ध्रुवीय व वाळवंट क्षेत्र वगळता जवळजवळ सर्वत्र आढळतात. किंगफिशर हा कोरासिफॉर्म्स वर्गातील लहान ते मध्यम आकाराच्या चमकदार रंगाच्या पक्षांची एक प्रजात आहे. या पक्षाच्या बहुतेक प्रजाती ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात.

किंगफिशर पक्षी प्रामुख्याने झाडांवर आणि पाण्याच्या आसपास बसतो. हे पक्षी अनेकदा नद्या व तळ्यांच्या काठावर सुद्धा आढळतात. झाडांवर राहणारे किंगफिशर झाडांवरील किडेखातात आणि पाण्याजवळ राहणारे मासे खातात.

किंगफिशरच्या अनेक प्रजाती जगाच्या विविध भागात आढळतात. या पक्ष्याच्या सुमारे ८७ प्रजाती आहेत. त्यापैकी पीड किंगफिशर, स्मॉल ब्लू किंगफिशर, ब्लॅक कॅप्ड किंगफिशर, लाफिंग जॅक किंगफिशर या मुख्य प्रजाती आहेत. भारतात किंगफिशरच्या ९ प्रजाती अढळतात.

सुबोध रणशेवरे, ठाणे
९८३३१४६३५६

Leave A Reply

Your email address will not be published.