ऑलम्पिक पदक विजेत्या भारतीय महिलांची यशोगाथा; लवलिना बोर्गोहेन (मुष्टियुद्ध)

0

लोकशाही, विशेष लेख

 

लवलिना बोर्गोहेन (Lovelina Borgohen) यांचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. त्या मूळच्या आसामच्या (Assam) गोलाघाटमधील आहे. त्यांचे वडील टिकेन बोरगोहेन आणि आई मॅमोनी बोरगोहेन आहेत. लवलिना यांच्या मोठ्या जुळ्या बहिणी लिचा आणि लिमा यासुद्धा राष्ट्रीय स्तरावर किकमुष्टियुद्ध (Kickboxing) खेळलेल्या आहेत.

लहान असताना लव्हलिनाच्या वडिलांनी बाजारातून मिठाई आणली होती. ती मिठाई ज्या पेपरमध्ये आणली आली होती, त्यात बॉक्सिंगपटू मोहम्मद अली (Muhammad Ali) यांच्याबद्दल लिहले होते. तेव्हा लव्हलिना यांनी वडिलांकडून मोहम्मद अलीबद्दल जाणून घेतले आणि तेथूनच बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली. लवलिना यांनीसुद्धा आपल्या बहिणीप्रमाणेच किकबॉक्सर म्हणूनच कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण संधी मिळताच त्या मुष्टियुद्धाकडे वळल्या. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने लवलिनाच्याच बारपाथर कन्या विद्यालयात चाचणी शिबीर भरवले होते, त्यात प्रशिक्षक पदुम बोरो यांनी त्यांची निवड केली. २०१२ मध्ये त्यांनी तिचे प्रशिक्षण सुरू केले व त्यानंतर संध्या गुरुंग यांनी काही काळ त्यांना प्रशिक्षण दिले. कालांतराने महिलांचे मुख्य प्रशिक्षक शिव सिंह यांनी तिला प्रशिक्षण दिले.

लव्हलिना या ऑलिम्पिक खेळणाऱ्या आसामच्या पहिल्या महिला खेळाडू आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या इंडिया ओपन या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. इंडिया ओपनमध्ये त्यांनी वेल्टरवेट श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले. त्यांना कारकिर्दीतली सर्वात मोठी संधी २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळाली. या स्पर्धेत त्यांची वेल्टरवेट श्रेणीत भाग घेण्यासाठी निवड झाली. तेथे उपांत्यपूर्व फेरीत युनायटेड किंग्डमच्या सँडी रायनकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर मात्र त्यांनी मागे न बघता सलग सरावाच्या जोरावर २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) कांस्य पदक (Bronze medal) जिंकले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, लव्हलिना यांना २०२० मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), आणि २०२१ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी, जळगाव
संपर्क- ७५८८९३१९१२

 

Leave A Reply

Your email address will not be published.