मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान

0

लोकशाही न्यूज  नेटवर्क 

किनगाव; शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उध्दव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान प्रमुख,हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री.धैर्यशील माने साहेब व शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी महापौर ठाणे मा.श्री.संजय मोरे साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.बालाजी रेड्डी साहेब याच्या मार्गदर्शन खाली.आज लातूर जिल्ह्यातील राजूर (अहमदपूर) तालुक्यातील किनगाव जि.प. गट अंतर्गत किनगाव पं. स. व धानोरा बु पं.स. व आंधोरी जि.प.गट अंतर्गत आंधोरी पं. स. व थोडगा पं. स. पदाधिकारी यांची गावोगावी जाऊन बैठक घेण्यात आली.

या बैठकीत शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहचवावे आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा , संघटना वाढीव साठी नियोजन इतर महत्वाचे मुद्यांवर चर्चा करण्यात आली व कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून(जाणून)  घेतल्या.

या वेळी प्रमुख मार्गदर्शन अभियान समन्वयक मा.श्री.कैलाशनाथपाठक साहेब यांचा सह  उपजिल्हाप्रमुख तथा कृ.ऊ.बा. स.सं. भारत सांगवीकर , तालुका प्रमुख विलास पवार,तालुका उपप्रमुख गणेश पांचाळ,माजी तालुका संघटक अनिकेत फुलारी,विभागप्रमुख किनगाव लक्ष्मण गुट्टे,विभागप्रमुख आंधोरी मारोती बिराडे,उपविभाग प्रमुख आंधोरी सोपान कोंडमगिरे,उपविभाग प्रमुख  किनगाव बस्वराज शिलगिरे,उपविभाग प्रमुख थोडगा मारोती आरदवाड,उपविभाग प्रमुख धानोरा बु गजानन यन्ने, कार्यालय प्रमुख विजय सोळंके व शाखाप्रमुख , आजी- माजी पदाधिकारी ,बूथ प्रमुख , युवासेना व ईतर पदाधिकारी,  कार्यकर्ते , मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.