पत्रकार गोरख भुसाळे यांना नाशिक पत्रकार संघाचा पुरस्कार

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

किनगाव; किनगाव ता अहमदपूर जिल्हा लातूर येथील पत्रकार गोरख शिवराज भुसाळे यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये चांगले कार्य केल्या बद्दल त्यांना राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव पुरस्कार नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते.किनगाव येथील पत्रकार गोरख भुसाळे यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अभिनेते हार्दिक जोशी(राणा दा तुझ्यात जीव रंगला मालिकेतील), अभिनेत्री सुरेखा लहामगे ,अभिनेत्री किरण राव,मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल क्वीन पूनम बिरारी,आंतरराष्ट्रीय जादूगर मधूगंधा इंद्रजीत व पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे सह आदी जण उपस्थित होते.

हा पुरस्कार सोहळा नाशिक येथील कालिदास कलामंदिर नाट्यगृहात दिनांक १३ रोजी रविवारीदुपारी संपन्न झाला.यावेळी शिवराज भुसाळे,दैवशाला भुसाळे,प्रिया भुसाळे,जान्हवी भुसाळे,विघ्नेश भुसाळे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.