चाळीसगाव राष्ट्रीय लोक अदालतीत, प्रलंबित दिवाणी व फौजदारी खटलाचा निपटारा,

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव:- मे. दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व वकिल संघ चाळीसगाव यांचे सयुक्त विद्यामानाने चाळीसगांव न्यायालयात वादपुर्व प्रकरणांच्या कर्ज व   न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या वसुली करीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते

सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव श्री. एन. के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ श्री. जी. व्ही. गांधे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगांव, फौजदारी न्यायालय क. स्तर चाळीसगांव श्री. ए. एच. शेख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगांव श्री. एम. व्ही. भागवत, श्री. फारुख शेख, अधिक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. जळगाव, श्री. संदिप शेंडगे, कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. चाळीसगाव, अध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव  अॅड. बी.के.पाटील,  सचिव वकीलसंघ चाळीसगांव अॅड. माधुरी एडके, तसेच पॅनल मेंबर्स अॅड. योगिता राजपूत, अॅड. कविता जाधव, अॅड. लव राठोड, अॅड. साईनाथ पी. महाजन व न्यायालयीन कर्मचारी सहा. अधिक्षक श्री. सी.के. बोरसे व श्री. आर.एस.सावदेकर, श्री. डी.के. पवार, श्री योगेश चौधरी, श्री. डी. टी. कु-हाडे, श्री. किशोर पाटील यांनी लोकन्यायालयाची कामकाज पुर्ण केले सदरील राष्ट्रीय लोक न्यायालयात पक्षकारांनी सोशल डिस्टन्सीग चे पालन करुन मोठया संख्येत उपस्थीती दिली. त्याच प्रमाणे न्यायालयात येणा-या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर व मास्क चा वापर बंधनकारक केले होते.

सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पुर्व ६५५७ इतके प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १८८२ इतके प्रकरणे निकाली काढण्यात येवुन त्याबाबतची वसुली रक्कम रु.१,७३,०२,७३१/-  इतकी करण्यात आली. त्याच प्रमाणे चाळीसगांव न्यायालयातील एकुण दाखल असलेले दिवाणी व फौजदारी  प्रकरणे ७५९ पैकी  १३५  इतके निकाली काढण्यात आले त्या बाबतची वसुली रक्कम रु.३,४९,३५,१६६/-  इतकी करण्यात आली.

तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव  श्री. एन. के. वाळके, यांनी म. गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगांव, सर्व सहा. अभियोक्ता चाळीसगांव, सर्व बॅंक अधिकारी, नगर पालिका अधिकारी, म.रा.वि.म. अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होणे करीता सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.