किनगाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील किनगाव गावांत आपल्या राहत्या घरात एका विवाहीत तरूणाने गळफास घेत केली. पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून, सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, किनगाव तालुका यावल येथे राहणारे युनुस पटेल (वय ३८ वर्ष) या तरुणाने दिनांक ३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ सलमान युनुस पटेल यांनी माहिती दिल्याने अक्समात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल वासुदेव मराठे करीत असुन, मयत अलताफ युनुस पटेल याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.