धक्कादायक; नांदेडच्या रुग्णालयात मृत्यू तांडव सुरु, २४ तासात २४ मृत्यू

0

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा तांडव सुरूच आहे. नांदेडमध्ये गेल्या २४ तासांत २४ मुत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. दुसरीकडे शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव थांबण्याचे नाव घेत नाहीय आहे. याच रुग्णालयामध्ये आता बाळासह आईचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. २२ वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिग प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर महिलेची प्रकृती बिघडत गेली. त्यानंतर बुधवारी महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. शनिवारपासून महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी कुटुंबियांना उपाचाराबाबत काही माहिती दिली नाही. सर्व औषधे आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी 40 ते 45 हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती मृत महिलेच्या पतीने दिली. मात्र बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.