सिक्कीममध्ये ढगफुटी, लष्कराचे २३ जवान बेपत्ता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सिक्कीममध्ये ढगफुटीने झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्कीमच्या उत्तर भागातील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुरात लष्कराचे २३ जवान देखील बेपत्ता आहे. या जवानांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

भयंकर पूर परिस्थितीनंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यानंतर खालच्या भागात देखील पाण्याची पातळी १५ते २० फूट वाढली होती. यामुळे सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने सुद्धा वाहून गेली आहे. यासोबतच २३ जवान बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सिक्किममध्ये तीस्ता नदीची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तीस्ता नदीला आलेल्या या पुरामुळे सिक्किम मधील सिंगथम फुटब्रिज देखील वाहून गेला आहे. तसेच जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे सुरू केले आहे. तसेच सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.