सोन्याच्या दरात प्रचंड घसरण, पहा जळगावातील दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी चढउतार सुरु आहे. सोन्याच्या दरात अचानक 660 रुपयाची घसरण झाली. आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 57380 रुपयापर्यंत खाली आलेत, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 52600 रुपये झालेत. गेल्या 8 दिवसांपासून सोन्याच्या दरात जवळपास 2000 रुपयाची घसरण झाली. दसरा-दिवाळीच्या आधी ही घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी दुकानामध्ये मोठी गर्दी होत आहे. दरम्यान चांदीच्या दरात काल 2 हजार रुपयाची घसरण झाली असून मुंबईत चांदी 71000 रुपये किलो आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 56,225 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत 405 रुपयांची घसरण होऊन 66,990 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगावमधील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याचे दर  57,700 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदी 68,500 रुपये प्रति किलो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.