अचानक दुचाकीसमोर कुत्रा आल्याने म्हसावदच्या महिलेचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुचाकीने जात असतानाच दुचाकीसमोर कुत्रा आल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना म्हसावद (ता.जळगाव) फाट्याजवळ घडली. चित्राबाई शालीग्राम पाटील (वय ३०) असे महिलेचे नाव आहे. चित्राबाई परिवारासह अमळनेर तालुक्यातील तांडेपूर येथे वास्तहव्यास होत्या. ३० सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास त्या मामेभाऊ व त्यांच्या मुलासोबत दुचाकीने जात होत्या, त्यावेळी अचानक कुत्रा दुचाकीसमोर आडवा आल्याने ब्रेक जोरात दाबला गेला व दुचाकी घसरून चित्राबाई खाली पडल्या. दुचाईसह घसरत जाऊन आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दोन्ही मुले झाली पोरकी
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत झालेल्या महिलेच्या पतीचे दोनच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांच्या अंतराने मातृ-पितृ छत्र हरपून त्यांची दोन्ही अपत्य अनाथ झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.