केंद्र सरकारच्या अघोषित हुकुमशाही विरोधात आत्मक्लेश आंदोलन

0

मुरबाड, लोकशाही न्यूज नेटवर्क

(सतिशचंद्र घरत) मुरबाड मध्ये महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या अघोषित हुकुमशाही विरोधात काँग्रेस, उध्दव ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सेक्युलर, सी पी आय एम आशा समविचारी पक्षांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. नोकर भरतीचे खाजगीकरण रद्द करा, गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव, कल्याण माळशेज महामार्ग चौपदरी करण, स्मार्ट प्रिंटेड इलेक्ट्रॉसीटी मीटर बंद करने, इत्यादी मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तीन हात नाक्या पर्यंत ‘जुडेगा भारत जितेगा इंडिया’, ‘केंद्र सरकारच्या अघोषित हुकुमशाही निषेध असो’, ‘केंद्र सरकारच्या जुलमी निर्णयांचा धिक्कार असो’ आशा घोषणा देत लॉंगमार्च काढण्यात आला. संबंधित लॉंगमार्च कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआय सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक वाघचौडे, नामदेव गायकवाड, सिपीआयएम चे दिलीप कराळे, कविता वारे शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विशे, उपजिल्हा प्रमुख आप्पा घुडे, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी समविचारी पक्षांचे कार्यकर्ते व तरुण वर्ग तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.