सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलेंडरवर मिळणार ३०० रुपयांची सबसिडी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सरकारच्या निर्णयामुळे गरीब, होतकरु आणि सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडर चे दर कमी केले आहे. घोषणेचा फायदा उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली.

केंद्र सरकारच्या वतीने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केली आहे. याआधी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. आता आणखी 100 रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त 600 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारने याआधी 37 दिवसांपूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात घेतला होता मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सप्टेंबर महिन्यात बैठक पार पडली होती. त्यावेळी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 75 लाख अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्यास मंजुरी दिली होती. तीन वर्षांसाठी केलं जाणाऱ्या या अतिरिक्त एलपीजी कनेक्शनचा 1650 कोटी रुपयांचा वित्तीय भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे, असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.