खेडी आव्हाणे येथे प्रौढाने उचलले टोकाचे पाऊल ..

0

जळगाव :- तालुक्यातील खेडी आव्हाणे येथील एका ५३ वर्षीय प्रौढाने तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी रात्री उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास श्रावण सोनवणे (५३, रा. खेडी आव्हाणे, ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, विलास श्रावण सोनवणे हे

पत्नी, मुलासह खेडी आव्हाणे येथे राहत असून ते गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होते. त्यांनी सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर शेजारील व्यक्तींच्या मदतीने सोनवणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि चार भाऊ असा परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.