लोकशाही न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्काराची घोषणा २४ ऑगस्टला करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला आहे. ‘पुष्पा’ चित्रपट १७ डिसेंबर २०२१ साली रिलीज झाला. चित्रपटाची क्रेझ इतकी होती की, निर्मात्यांनी हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित निर्णय घेतला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ भूमिकेचे सर्वत्र कौतुक आले. अल्लू अर्जुनला याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
अल्लू अर्जुन लूक
अल्लू अर्जुनने या खास सोहळ्यासाठी त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. या सोहळ्यासाठी अल्लू अर्जुनने व्हाईट रंगाचा आऊटफिट निवडला होता. ब्लॅक पॉकेट असलेला व्हाईट सूट अल्लू अर्जुनने घातला होता. अल्लू अर्जुनसह कन्नड, मल्याळम भाषेतील चित्रपटांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. RRR चित्रपटाला ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.