अवकाळी पावसामुळे ८ हजार केळीचे पीक जमीनदोस्त

0

 

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपून काढले आहे. यातच केली उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. यात लाखो रुपयांचा खर्च करून पिकवलेली ८ हजार केळीचे खोड जमिनीला टेकले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून, नवापूर तालुक्यात काढणीला आलेल्या भट शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याच दरम्यानतळोदा तालुक्यातील मोड शिवारात लागवड केलेली केली अबकाली वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका महिन्याने तोडणीला आलेली केली पीक जमीनदोस्त केले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

शेतकरी जगदीश काशिनाथ चौधरी यांनी आपल्या शेतात मार्च महिन्यात ४ एकरात केली पिकाची लागवड केली होती. मोठ्या मेहतीने ८ हजार ५०० खोडांची लागवड करून संगोपन केले. त्यावर रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर करून लाखोंचा खर्च केला. परंतु झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन एका महिन्याने तोडणीला आलेली केली पीक जमीनदोस्त केले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.