रागाच्या भरत पत्नीने चावला पतीचाच कान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजधनी दिल्लीतील सुलतान पुरी भागातून अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने राहच्या भरत तिच्या नवऱ्याचा कान जोरात चावला पोलिसांनी रविवारी याप्रकरणी माहिती दिली. कान जोरात चावल्यामुळे उजव्या कानाचा वरचा भाग तुटला असून, त्याची सर्जरी करावी लागल्याचे पीडित इसमाने सांगितले. पीडित व्यक्तीने उपचारांनंतर त्याच्या पत्नीविरोधात तक्रारही दाखल केली आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

पीडित इसमाने दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तो घराबाहेर केर टाकण्यासाठी गेला. तेव्हा त्याने पत्नीला घराची साफसफाई करण्यास सांगितले. मात्र तो घरात परत येताच , त्याच्या बायकोन विनाकारण त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. सोबतच कामानिमित्त मी बाहेर पडताच होतो तेवढ्यात बायकोने मला मागून पकडलं आणि रागाच्या भरात तिने माझा उजवा कान एवढ्या जोरात चावला की माझ्या कानाचा वरचा भाग तुटला. त्यानंतर माझ्या मुलाने मला तातडीने उपचारांसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर माझ्या कानाचे ऑपरेशन करण्यात आलं, असंही त्याने नमूद केले.

पोलिसांनी सुरू केला तपास
२० नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एक पथक पाठवलं. मात्र पीडित इसम तेव्हा खूप अस्वस्थ होता आणि जबाबा देण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. अखेर दोन दिवसांनी २२ नोव्हेंबर रोजी त्याने पोलिसांशी संपर्क साधून लेखी तक्रार नोंदवली. या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.