जळगाव ;-ऑनड्यूटीवर असतांना वाशरूममध्ये अचानक चक्कर येवून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूमला सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. गोविंद प्रेमचंद मोरे (वय-५०) रा. नाका रोड धुळे ह.मु. भुसावळ असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
धुळे येथील रहिवाशी असलेले गोविंद प्रेमचंद मोरे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह भुसावळ येथे वास्तव्याला होते. जळगाव पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूमला ते नोकरीला होते. रविवारी २६ नोव्हेंबर रोजी ते नाईट ड्यूटीला होते. सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ऑनड्यूटी असतांना ते वॉशरूममध्ये गेल्यावर त्यांना अचानक चक्कर येवून पडल्याने बेशुध्द झाले.
त्यांना तातडीने आर्कीड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. ही घटना नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे..