वरणगाव येथे कत्तलीसाठी १८ म्हशी घेऊन जाणारे वाहन जप्त

0

१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वरणगाव : – राविवारी पहाटेच्या सुमारास अवैधरित्या कत्तलीसाठी १८ म्हशी घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले असून दोन जणांना अटक केल्याची कारवाई केली. १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ध्यप्रदेश राज्यातून मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर व वरणगाव मार्गे बंदीस्त वाहनातून रविवारी पहाटेच्या सुमारास रावेरकडून आयशर ट्रक वाहन हतनूर मार्गे बोहीं लगतच्या महामार्गाकडे जात असतांना गस्तीवर असलेले वरणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोहेकॉ रामचंद्र मोरे व पोकॉ ईश्वर तायडे यांनी या वाहनाची तपासणी केली. या वाहनांमध्ये १८ म्हशी निर्दर्वीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल वाहन चालक रईस कामीन मेवाती (रा. झाकेर ता जि सज्जापूर) व सादीक अयुबखान (रा. चायनी ता कालापिपल जि. सज्जापूर, मध्यप्रदेश) यांना गुरांच्या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी हि गुर छत्रपती संभाजी नगर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले वरणगांव पोलीसांनी वरील दोघां विरुध्द पोकों ईश्वर तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.