खिलाडी कुमारची OTT वर जादू कायम

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

२०२२ हे वर्ष तस पहिले तर बॉलिवूडसाठी (Bollywood) फार चांगलं राहीलं नाही. अगदी हातावर मोजके चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले होते. या वर्षात सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट जर कुणाचे ठरले असतील तर ते खिलाडी कुमारचे होते. मागच्या पूर्ण वर्षात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) जादू दाखवू शकला नाही. वर्ष निराशाजनक गेलं असेल तरी अक्षयसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्याचा डिजिटल रिलीज ‘कठपुतली’ (Kathaputali) हा गेल्या वर्षी ओटीटीवर (OTT) सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट ठरला आहे.

तसेच अजय देवगणची (Ajay Devgn) ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra the Age of Darkness) ही वेब सिरीज व ‘कठपुतली’ हा चित्रपट या ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्याच्या यादीत शामिल झाले आहे. चित्रपटांच्या बाबतीत ‘कठपुतली’नंतर यामी गौतमचा (Yami Gautam) ‘द थर्सडे’ चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर, विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या यादीत दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone)‘गहराइयां’ चित्रपटाचाही समावे आहे. हा चौथ्या क्रमांकावर असून कार्तिक आर्यनचा (Karthik Aryan) ‘फ्रेडी’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर राहिला.

‘कठपुतली’ चित्रपटात अक्षय कुमारने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यामध्ये रकुल प्रीत सिंगचीही महत्त्वाची भूमिका होती. तर, ‘द थर्सडे’मध्ये यामी गौतमबरोबर नेहा धुपियाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.