प्रकृती ठीक नसल्याने राहुल द्रविडचा तिरुवनंतपुरम दौरा रद्द

0

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क

गुरुवारी इडन गार्डन्सवरील (Eden Garden) दुसऱ्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेला टीम इंडिया (Team India) ने हरवलं. या विजयासह टीम इंडियाने तीन वनडे सामन्याच्या सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी सर्व चांगल घडत असताना, एक चिंता जनक बाब समोर आली आहे. टीमचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी (Third ODI) टीमसोबत जाणार नाहीत. राहुल द्रविड यांची तब्येत ठीक नसल्याने ते थेट बंगळुरूला आपल्या घरी रवाना झाले आहेत. तिसरा सामना भारतासाठी फक्त औपचारिकता मात्र असेल. कारण भारताने सीरीज आधीच जिंकली आहे. श्रीलंकेची टीम दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

नेमका काय त्रास द्रविड यांना होत आहे ?

दुसऱ्या मॅच दरम्यान हॉटेलमध्ये असताना, राहुल द्रविड यांना ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता. मॅच दरम्यान ते ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित होते. बंगाल क्रिकेट संघटनेने राहुल द्रविड यांच्यासाठी डॉक्टर बोलावले व त्यानं त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला. आता ते बंगळुरुला जाऊन उपचार घेतील. डॉक्टर ने परवानगी दिली तर ते, 15 जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी उपस्थित राहतील.

अशी जिंकली मॅच

श्रीलंकेच्या टीमने पहिली बॅटिंग केली. पण ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या बॉलर्सनी श्रीलंकेला 215 धावांवर रोखलं. भारताने हे सोप लक्ष्य 43.2 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून पूर्ण केलं. कुलदीपने या मॅचमध्ये तीन विकेट काढल्या. के.एल. राहुलच्या संयमी फलंदाजीमुळे टीम इंडियाने हा विजय मिळवला. त्याने 103 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 36 रन्स केले तर अक्षर पटेलने (Akshar Patel) 21 धावांच योगदान दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.