धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पहिलेच कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. यात शेतकऱ्याने वेचणी केलेल्या कपाशीची चोरी झाल्याने प्रकार घडत आहे. असाच प्रकार धुळे जिल्ह्यातील चिचखेडा गावात घडला आहे. यात तब्बल ३२ क्विंटल कपाशी चोरीला गेल्याचे समोर येत आहे.
म्हसदी-चिचखेडे रस्त्यावर चिंचखेड येथील शेतकरी केदार रामचंद्र पाटील यांची बाहयाती अशेती आहे. पातेलं यांचे शेतातच घर आहे. शेतातील घराजवळच शेतातील माल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड उभारली आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे ३२ क्विंटल कपाशी पोत्यामध्ये ठेवली होती.
सध्या कपाशीला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशी संग्रही ठेवली आहे. परंतु शेळमध्ये ठेवलेला हा कापूस आता सुरक्षित नसल्याचे जाणवू लागले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच साधली संधी
लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळीच्या मध्यरात्रीस चोरट्यांनी पोत्यात भरून ठेवलेली कपाशी लांबवली. सकाळी पाटील शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. पाटील कुटुंबीयांनी साक्री पोलिसांना घटनेची माहिती दिली. सध्या भुरट्या चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.