रोहितच अर्धशतक हुकलं, तरी ‘हा’ नवीन विक्रम केला आपल्या नावे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. जगातील सर्वत मोठ्या स्टेडियमवर १.३० लाखांहून अधिक क्रिकेट चाहत्यांनी हजेरी लावली. दरम्यान या सामन्यात रोहितच अर्धशतक हुकले असलं, तरी त्याच्या नावे एक मोठा विक्रम झाला आहे.

रोहितचा मोठा विक्रम..
भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. या सामन्यात रोहितने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो ३१चेंडूंचा सामना करत ४७ धाव करत मधारी परतला. यादरम्यान तो एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धाव करणारा कर्णधार ठरला आहे.

रोहित शर्मा (भारत) – ५९७ धावा* (२०२३)

केन विलियम्सन (न्यूझीलंड) – ५७८ धावा (२०१९)

महेला जयवर्धने (श्रीलंका) – ५४८ धावा (२००७)

Leave A Reply

Your email address will not be published.