धक्कदायक; कचरा वेचणाऱ्या महिलेने पळविले 2 वर्षांचे बाळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंगणात खेळणाऱ्या दोन वर्षांच्या बाळाला कचरा वेचणाऱ्या महिलेने पळविले. हा प्रकार शेजारच्या महिलेच्या लक्षात येताच तिने पाठलाग करत, कचरा वेचणाऱ्या महिलेच्या तावडीतून बाळाची सुखरूप सुटका केली. ही धक्कादायक घटना संभाजीनगर येथील विश्रांती नगर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली आहे. याप्रकरणी पुंडलिक नगर ठाण्यात महिलेसह तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आपल्या पती आणि दोन वर्षांच्या बाळासह विश्रांती नगर परिसरात राहते. महिलेचा पती सेंट्रिंगचे काम करतो,
दरम्यान रविवारी पती कामावर गेला असताना महिला घर कामात व्यस्त होती तिचे दोन वर्षांचे बाळ अंगणात खेळत होते. त्याचवेळी एक अनोळखी महिला तिथे आली आणि आपल्याकडे कोणाचं लक्ष नसल्याची खात्री होताच आरोपी महिला बाळाला घेऊन पसार झाली. हा प्रकार लक्षात येतात शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तातडीने आरोपी महिलेचा पाठलाग करत बाळाची सुटका केली.
या घटनेनंतर बाळाच्या आईने पुंडलिक नगर ठाण्यात धाव घेत महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.