धक्कादायक ; चाळीसगावात ११ वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देऊन भंगार विक्रेत्याकडून अत्याचार

0

चाळीसगाव : – शहरातील एका भागातील 11 वर्षीय अल्पवयीन बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 13 रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी संशयित भंगार विक्रेता अफरखान राऊत खान (22, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दिली वडिलांना जीवे मारण्याची धमकी
पीडीतेच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात आरोपीविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यांची 11 वर्षीय बालिका बाहेर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट दिले तसेच शंभर रुपये देत एका घरात नेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही गोष्ट कुणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शहर निरीक्षक संदीप पाटील आदींनी भेट दिली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.