नाशिक गारठले, दोन ते तीन दिवस गारठा जाणवणार !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. मंगळवारी नाशिक मध्ये नीचांकी तापमान नोंदविण्यात आला आहे. नाशिक शहरात 9.8 सेल्सिअल्स किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर सोमवारी 29.3 कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

मकर संक्रांति पासून दिवस वाढतो आणि थंडी कमी होत जाते असं म्हटलं जातं. मात्र यावर्षी उलट चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक मधील किमान तापमानात अचानक घट झाली आहे. मंगळवारी पारा 9.8 अंशांवर जाऊन पोहोचला आहे. थंडीमुळे नाशिककर चांगलेच गारठले आहे.

दोन ते तीन दिवस गारठा जाणवणार
दोन पूर्वी रविवारी किमान तापमान 15.4 होते. मंगळवारी तापमान 9.8 अंश सेल्सियस वर जाऊन पोहोचले आहे. उत्तरेकडील शीत लहरींचा परिणाम सध्या दिसून येत आहे. आणखी दोन ते तीन दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.