एलियन्स पृथ्वीवर येऊच शकणार नाही ; कारण एक अब्ज वर्ष लागतील !

0

वॉशिंग्टन : जगभरात पृथ्वीवर एलियन्स असल्याचे अनेक दावे करण्यात येतात. मात्र खरेच एलियन्स पृथ्वीवर आले तर जिवंत राहू शकतील का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. एका प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाने असा दावा केला की, जर अशा प्रकारचा कोणताही प्राणी असेल तर तो पृथ्वीवर जिवंत राहू शकत नाही.

एलियन्स पृथ्वीवर येऊन गेले, त्यांना पाहिल्याचे अनेक दावे जगभरात करण्यात येतात. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका शॉपिंग मॉलच्या बाहेर एलियन्स पाहिल्याचे सांगितले गेले. एका दहा फूट उंचीच्या एलियन्सला लोकांनी पाहिले, असा दावा करण्यात आला. तेव्हापासून स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. खरेच असे झाले आहे का? एलियन्स पृथ्वीवर आले तर जिवंत राहतील? एका शास्त्रज्ञाने सत्य सांगितले की, अशा प्रकारचे प्राणी पृथ्वीवर येऊ शकतात, ते दिसायला कसे असतील आणि माणसाशी कसे संपर्क करतील. हे जाणल्यानंतर सर्व दावे खोटे ठरतील.

हार्वर्डचे खगोलशास्त्रज्ञ एवी लोएब यांनी वायुमंडळात एलियन्सला पाहिल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. एलियन्स अशा प्रकारचे आहेत ते आपल्या पृथ्वीवर आले तरी जिवंत राहू शकत नाहीत. कारण आकाशगंगेच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला जाईपर्यंत जवळपास एक अब्ज वर्ष लागतात. त्यामुळे मला वाटत नाही की, कोणतेही अंतराळ यान कोणत्याही अन्य ताऱ्यावरून एलियन्ससारख्या प्राण्यांना आपल्या पृथ्वीवर घेऊन येऊ शकेल. दरम्यान, नासाने २०२२ मध्ये एका संशोधनानंतर सांगितले होते की, यूएफओ-एलियन्सचे यान पाहिल्याचे सांगणे हा केवळ भ्रम आहे.

लोएब पुढे म्हणाले की, कोणत्याही ग्रहावरून कोणी आलेच तर अंतराळातील खूप ऊर्जावान कणांशी त्याचा सामना होईल, यातून वाचणे जवळपास अशक्य आहे. जरी यातून वाचून ते पृथ्वीवर येत असतील तर त्यांच्याजवळ कृत्रिम डोके, कृत्रिम बुद्धी आहे, असे समजा. त्यामुळे आपल्याला एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते जर एवढे शक्तिशाली असतील तर या तंत्रज्ञानाच्या संपर्कात येऊ शकतात. आणि आपण त्यांना ओळखू शकू मात्र आतापर्यंत जे संशोधन झाले आहे, यावरून स्पष्ट आहे की, एलियन्स पृथ्वीवर आले तर जिवंत राहू शकणार नाहीत

 

Leave A Reply

Your email address will not be published.